Pradhanmantri Aawas Yojana-Urban 2025
प्रधानमंत्री आवास योजना ही केंद्र सरकारची सामाजिक कल्याणकारी अशी प्रमुख योजना आहेत. या योजनेअंतर्गत देशातील शहरी आणि ग्रामीण भागातील कमकुवत घटक, कमी उत्पन्न गटातील लोक, शहरी गरीब आणि ग्रामीण भागातील गरिबांना परवडणाऱ्या किमतीमध्ये घरे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री आवास योजना 2015 मध्ये सुरू करण्यात आली.
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत देशातील पात्र लाभार्थ्यांना परवडणाऱ्या किमतीत सुमारे 2 कोटी घरे बांधण्यात येणार आहेत. 2023 च्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये या योजनेचा खर्च 66% ने वाढवून 79,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त करण्यात आला.
प्रधानमंत्री आवास योजनेचे मुख्य दोन घटक आहेत, यामध्ये…
- प्रधानमंत्री आवास योजना शहरी (PMAY-U)
- प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण (PMAY-G)
या पोस्टमध्ये आपण प्रधानमंत्री शहरी आवास योजनेबद्दलची संपूर्ण माहिती पाहूया.
प्रधानमंत्री शहरी आवास योजनेविषयी (PMAY-U) थोडक्यात..
केंद्र सरकारने 25 जून 2015 रोजी प्रधान वरील घटकांसाठी या योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या घरांचा आकार तीस चौरस मीटर कार्पेट क्षेत्रफळापर्यंत असू शकतो आहेमंत्री शहरी आवास योजना देशातील शहरी भागामध्ये राहणाऱ्या गरीब कुटुंबांना स्वतःचे घर उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरू केली. या योजनेमध्ये विशेषतः शहरी भागातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक(EWS) कमी उत्पन्न गट (LIG) आणि मध्यम उत्पन्न गट (MIG) यांच्यासाठी परवडणारी घरे बांधून देण्याची तरतूद आहे. वरील घटकांसाठी घराचा आकार 30 चौरस मीटर कार्पेट क्षेत्रफळापर्यंत असू शकतो. तथापि देशातील राज्य व केंद्रशासित प्रदेशांना मंत्रालयाच्या सल्लामसलत आणि मंजुरीनंतर घरांचा आकार वाढवण्याची लवचिकता आहे.
गरीब कुटुंबांना शहरांमध्ये स्वतःचे घर मिळावे हा मुख्य उद्देश या योजनेचा आहे, म्हणूनच घर बांधणीसाठी किंवा खरेदीसाठी केंद्र सरकारकडून लाभार्थ्यांना थेट अनुदान दिले जाते. या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला कर्जाचीही सवलत दिली गेली आहे. कर्ज घेणाऱ्याला व्याजदरात सुट सुद्धा दिली जाते. या योजनेमध्ये घराच्या मालकी हक्कासाठी महिलांचे नाव असणे आवश्यक आहे. या योजनेसाठी केंद्र सरकारकडून सर्व समावेशक धोरण राबवण्यात आले आहे यामध्ये अपंग, वृद्ध नागरिक, अनुसूचित जाती-जमातींनाही प्राधान्य देण्यात आले आहे. त्याचबरोबर या योजनेअंतर्गत घरासोबतच पायाभूत सुविधा सुद्धा देण्यात आले आहेत यामध्ये पाणी, वीज, गॅस, शौचालय, गटार, रस्ते यांचा समावेश आहे.
प्रधानमंत्री शहरी आवास योजनेची(PMAY-U) उत्पन्न मर्यादा
प्रधानमंत्री शहरी आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी केंद्र सरकारने उत्पन्न मर्यादा घालून दिले आहे. केंद्र सरकारने घालून दिलेल्या उत्पन्न मर्यादेमध्ये जर तुम्ही पात्र होत असाल तर तुम्ही या या योजनेचा लाभ घेऊ शकता अन्यथा तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यासाठी अपात्र असाल.
- आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक (EWS): वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयांपर्यंत
- कमी उत्पन्न गट (LIG): वार्षिक उत्पन्न 3 ते 6 लाख रुपये
- मध्यम उत्पन्न गट-1(MIG-1): वार्षिक उत्पन्न 6 ते 12 लाख रुपये
- मध्यम उत्पन्न गट-2(MIG-2): वार्षिक उत्पन्न 12 ते 18 लाख रुपये
प्रधानमंत्री शहरी आवास योजनेसाठी(PMAY-U) असतील हे लाभार्थी
- कामगार
- शहरी गरीब यामध्ये रिक्षा चालक, रस्त्यावरील विक्रेते व इतर सेवा प्रदान करणारे इ.
- औद्योगिक कामगार
- आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि कमी उत्पन्न असणारे स्थलांतरित
- अनुसूचित जाती-जमाती, इतर मागासवर्गीय, विधवा आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल व कमी उत्पन्न असणारे अल्पसंख्यांक
प्रधानमंत्री शहरी आवास योजनेअंतर्गत(PMAY-U) असणारे 4 प्रमुख घटक
- शहरी भागातील झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्यांसाठी त्याच ठिकाणी घरे बांधून देणे.
- Credit Linked Subsidy Scheme अंतर्गत गृहकर्जावर व्याजदरामध्ये सबसिडी दिली जाते.
- सरकारी व खाजगी भागीदारीतून लाभार्थ्यांसाठी परवडणारी घरी बांधणे.
- लाभार्थ्याला स्वतःच्या जागेवर नवीन घरं बांधण्यासाठी केंद्र सरकार 2.30 लाख रुपयांचे अनुदान देते.
प्रधानमंत्री शहरी आवास योजनेसाठी(PMAY-U) आवश्यक पात्रता
प्रधानमंत्री शहरी आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक त्या अटी व शर्ती मध्ये पात्र होणे आवश्यक आहे. सदरच्या अटी व शर्ती कोणत्या आहेत? हे आपण खाली पाहूया:
- सदर योजनेसाठी अर्ज करणारा अर्जदारा भारतीय नागरिक असावा.
- सदर योजनेसाठी अर्ज करणारा अर्जदार किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्याच्या (पती, पत्नी व अविवाहित मुले) नावावर कुठेही पक्के किंवा कायमस्वरूपी घर नसावे.
- अर्जदाराने कर्जाच्या पात्रतेसाठी बँकांच्या अटी व शर्ती पूर्ण करणे आवश्यक आहे.
- अर्जदाराने या आधी कोणत्याही केंद्र किंवा राज्य सरकारच्या घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
- या योजनेअंतर्गत महिला अर्जदारांना प्राधान्य दिले जाईल.
प्रधानमंत्री शहरी आवास योजना(PMAY-U) आवश्यक कागदपत्रे
प्रधानमंत्री शहरी आवास योजनेसाठी अर्ज करताना अर्जदाराला काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. सदरची कागदपत्रे कोणती आहेत? आपण खाली पाहूया:
- आधार कार्ड
- उत्पन्नाचा पुरावा
- बँक पासबुक
- घर नसल्याचे प्रमाणपत्र
- जमीन किंवा घराचे दस्तऐवज
- पासपोर्ट साईज फोटो
प्रधानमंत्री शहरी आवास योजनेसाठी (PMAY-U) अर्ज कसा करायचा?
प्रधानमंत्री शहरी आवास योजनेसाठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा? याबाबतची स्टेप बाय स्टेप माहिती आपण खाली पाहूया:
- सर्वप्रथम तुम्हाला या योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल.👇🏼 https://pmay-urban.gov.in/
- या संकेतस्थळावर गेल्यानंतर होमपेजवर Apply for PMAY-U 2.0 या पर्यायावर क्लिक करा.
- या योजनेची सर्व मार्गदर्शक तत्वे आणि सूचना काळजीपूर्वक वाचा.
- तुमचे वार्षिक उत्पन्न आणि इतर माहिती लिहून तुमची पडताळणी करा.
- त्यानंतर आधार कार्ड माहिती सत्यापित करा.
- अर्जामध्ये तुमचा पत्ता, उत्पन्नाचा पुरावा आणि इतर आवश्यक माहिती काळजीपूर्वक भरा.
- या योजनेसाठी लागणारी सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
- फॉर्म सबमिट करण्यापूर्वी पुन्हा एकदा काळजीपूर्वक वाचा.
- अशा पद्धतीने तुम्ही प्रधानमंत्री शहरी आवास योजनेचा अर्ज ऑनलाइन करू शकता.
ऑनलाइन अर्जाबरोबरच ऑफलाइन अर्ज सुद्धा या योजनेसाठी करता येतो, यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या कॉमन सर्विस सेंटरमध्ये (CSC) जाऊन या योजनेसाठी तुम्ही ऑफलाईन अर्ज करू शकता.
प्रधानमंत्री शहरी आवास योजना ही शहरातील गरीब व गरजू नागरिकांसाठी एक खूपच महत्त्वाची योजना ठरली आहे. कारण या योजनेअंतर्गत सरकारकडून आर्थिक मदत घेऊन स्वतःचे घर बांधणे सोपे झाले आहे. म्हणूनच आपण या पोस्टमध्ये प्रधानमंत्री शहरी आवास योजनेबाबतची संपूर्ण माहिती पाहिली आहे. वरील माहितीच्या आधारे तुम्ही सुद्धा या योजनेचा लाभ घेऊन तुमच्या स्वप्नातील घर बांधू शकता. धन्यवाद!