केंद्र व राज्य सरकार देशातील गरीब व गरजू घटकांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अनेक योजना सुरू केल्या आहेत. म्हाडा घरकुल लॉटरी योजना ही या उपक्रमाचा एक भाग आहे. या योजनेअंतर्गत राज्य सरकार राज्यातील गरीब व गरजू घटकांना परवडणाऱ्या घरांच्या सुविधा उपलब्ध करून देते.
म्हाडा घरकुल लॉटरी योजना ही पारदर्शक, संगणकीकृत सोडत/लॉटरी प्रणालीद्वारे विविध उत्पन्न गटांना फ्लॅट आणि भूखंडाचे वाटप करते, ज्यामुळे राज्यातील खरीप व गरजू लोकांचे पक्क्या घरांचे स्वप्न पूर्ण होते.
या पोस्टमध्ये आपण म्हाडा घरकुल लॉटरी योजनेची संपूर्ण माहिती पाहूया.
म्हाडा (MHADA) घरकुल लॉटरी योजनेविषयी थोडक्यात..
महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (Maharashtra Housing and Area Development Authority) संस्था 1977 रोजी स्थापन करण्यात आली असून, महाराष्ट्रातील सर्वसामान्य लोकांना परवडणारी सुरक्षित आणि दर्जेदार घरी उपलब्ध करून देणे हे म्हाडाचे मुख्य उद्दिष्ट आहेत.
म्हाडा अंतर्गत विविध गृहनिर्माण योजना राबवल्या जातात ज्याद्वारे गरीब व मध्यमवर्गीय नागरिकांना लॉटरी पद्धतीने घरे देण्यात येतात. ही घरे मुंबईसह महाराष्ट्रातील इतर महानगरात जसे की पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, कोकण, ठाणे इ. ठिकाणी उपलब्ध आहेत.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल (EWS), मध्यम उत्पन्न गट (MIG), कमी उत्पन्न गट (LIG) आणि उच्च उत्पन्न गट (HIG) अशा विविध उत्पन्न घटकांना या योजनेअंतर्गत घरे बांधण्यासाठी अनुदान दिले जाते.
म्हाडा (MHADA) घरकुल लॉटरी योजनेचे फायदे
- आजच्या घडीला शहरांमध्ये सर्वसामान्य लोकांना घर घेणे शक्य नाही, परंतु या योजनेअंतर्गत आता सर्वसामान्य लोक शहरांमध्ये स्वतःचे घर मिळवण्याची संधी आहे.
- या योजनेअंतर्गत मोठमोठ्या शहरांमध्ये नव्याने विकसित होणाऱ्या भागात घरे उपलब्ध होतात. त्यामुळेच शहराच्या विकास क्षम परिसरात स्वतःचे घर उपलब्ध होते.
- या योजनेअंतर्गत मिळणारी घरी ही सरकारच्या आखत्यारीत असल्यामुळे कोणत्याही फसवणुकीचा धोका नाही.
- या योजनेअंतर्गत बँकांकडून गृह कर्ज मिळवणे सुलभ होते.
म्हाडा (MHADA) घरकुल लॉटरी योजना पात्रता
म्हाडा घरकुल लॉटरी योजनेसाठी ची आवश्यक पात्रता आपण खाली पाहूया:
- सदर योजनेसाठी अर्ज करणारा अर्जदार हा मागील 15 वर्षे महाराष्ट्रामध्ये वास्तव असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
- अर्जदाराचे किमान वय 18 वर्षे असावे.
- म्हाडा घरकुल लॉटरी योजनेसाठी अर्जदाराकडे पॅन कार्ड सोबतच स्थिर उत्पन्नाचा स्त्रोत असणे आवश्यक आहे.
म्हाडा घरकुल लॉटरी योजनेसाठी अर्जदाराच्या काही निश्चित उत्पन्न श्रेणी निश्चित केल्या आहेत. ज्यावर आधारित त्यांना या योजनेअंतर्गत घरे दिली जातात. त्यानुसार…
- आर्थिक दृष्ट्या मागास (EWS) : ₹25,000 पर्यंत
- कमी उत्पन्न गट (LIG) : ₹25,001 ते ₹50,000
- मध्यम उत्पन्न गट (MIG) : ₹50,001 ते ₹75,000
- उच्च उत्पन्न गट (HIG) : ₹75,001 आणि त्याहून अधिक
म्हाडा (MHADA) घरकुल लॉटरी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
म्हाडा घरकुल लॉटरी योजनेसाठी काही आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक असते. सदरची महत्त्वाची कागदपत्रे कोणती आहे? ते आपण खाली पाहूया:
- आधार कार्ड
- रहिवासी प्रमाणपत्र
- उत्पन्न प्रमाणपत्र
- ओळखीच्या पुराव्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, मतदार ओळखपत्र, इ.
- जन्म प्रमाणपत्र
- पॅन कार्ड
- बँक पासबुक
- पासपोर्ट साईज फोटो
म्हाडा (MHADA) घरकुल लॉटरी योजनेसाठी अर्ज कसा करायचा?
म्हाडा घरकुल लॉटरी योजनेचा लाभ घेणाऱ्या इच्छुक अर्जदार ऑनलाइन अर्ज करू शकता. ऑनलाइन अर्ज कसा करायचा? याबाबतची स्टेप बाय स्टेप माहिती आपण खाली पाहूया:
- म्हाडा घरकुल लॉटरी योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला म्हाडाच्या या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल. 👇🏼https://lottery.mhada.gov.in/
- म्हाडाच्या संकेतस्थळावर गेल्यानंतर तुम्हाला स्वतःची नोंदणी करावी लागेल किंवा जर तुमचे या अगोदरच खाते असेल तर, लॉगिन करा.
- त्यानंतर सर्व आवश्यक तपशील, मोबाईल नंबर टाकून OTP सत्यापित करा.
- त्यानंतर तुमचा वैयक्तिक आणि व्यावसायिक तपशील भरून आवश्यक ती कागदपत्रे JPEG स्वरूपात अपलोड करा.
- त्यानंतर ऑनलाईन पेमेंट करून अर्ज पूर्ण करून सबमिट करा.
- अर्ज प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्हाला एक पावती स्लिप मिळेल.
अशा पद्धतीने तुम्ही सदर योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता.
म्हाडा (MHADA) घरकुल लॉटरी योजनेच्या विजेत्यांची यादी कशी चेक करायची?
- म्हाडा घरकुल लॉटरी योजनेच्या विजेत्यांची यादी चेक करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल.👇🏼 https://lottery.mhada.gov.in/
- अधिकृत संकेतस्थळावर गेल्यानंतर ‘लॉटरी निकाल’ यावर क्लिक करा.
- त्यानंतर ‘पहा’ यावर क्लिक करून विजेत्यांची यादी शोधण्यासाठी स्कीम कोड आणि श्रेणीनुसार या पृष्ठावर स्क्रोल करा.
- शेवटी तुम्हाला विजेत्यांचे नाव आणि या योजनेअंतर्गत मिळालेल्या घराच्या क्रमांकाची माहिती देणारी पीडीएफ फाईल मिळेल.
- पीडीएफ फाईल ओपन करून तुम्ही विजेत्यांची नावे चेक करू शकता.
म्हाडा (MHADA) घरकुल लॉटरी प्रक्रिया
म्हाडाची घरकुल लॉटरी प्रक्रियाही अत्यंत पारदर्शक पद्धतीने होते. लॉटरीची तारीख आधीच जाहीर केली जाते. या योजनेसाठी निवड झालेल्यांना ई-मेल व एसएमएसद्वारे कळवले जाते. जर एखाद्याला या योजनेअंतर्गत घरकुल लॉटरी लागली नाही तर त्याची नोंदणी फी परत केली जाते. जे अर्जदार घरकुल लॉटरीमध्ये यशस्वी ठरतात, त्यांच्याकडून घरासाठीची उर्वरित रक्कम भरून, त्यांच्याकडून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करूनच त्यांना घराचा ताबा दिला जातो.
म्हाडा (MHADA) घरकुल लॉटरी बोर्ड
म्हाडा घरकुल लॉटरी बोर्ड महाराष्ट्रमध्ये 6 आहेत, ते कोणकोणते आहेत हे आपण खाली पाहूया:
- म्हाडा मुंबई घरकुल लॉटरी बोर्ड
- म्हाडा पुणे घरकुल लॉटरी बोर्ड
- म्हाडा पुणे एफसीएफएस घरकुल लॉटरी बोर्ड
- म्हाडा कोकण घरकुल लॉटरी बोर्ड
- म्हाडा कोकण एफसीएफएस घरकुल लॉटरी बोर्ड
- म्हाडा औरंगाबाद घरकुल लॉटरी बोर्ड
- म्हाडा अमरावती घरकुल लॉटरी बोर्ड
म्हाडा (MHADA) घरकुल लॉटरी योजनेअंतर्गत घरांच्या किमती
म्हाडा घरकुल लॉटरी योजनेअंतर्गत घरांच्या किमती आपण खाली पाहूया:
- आर्थिकदृष्ट्या मागास (EWS) – ₹20 लाख रुपयांपेक्षा कमी
- कमी उत्पन्न गट (LIG) – ₹20 लाख ते ₹30 लाख
- मध्यम उत्पन्न गट (MIG) – ₹35 लाख ते₹60 लाख
- उच्च उत्पन्न गट (HIG) – ₹60 लाख ते ₹5.8 कोटी
म्हाडा घरकुल लॉटरी योजनाही महाराष्ट्रातील शहरांमध्ये राहणाऱ्या लाखो कुटुंबांसाठी आशेचा किरण आहे. सध्याच्या घडीला गरीब व मध्यमवर्गीय लोकांना शहरांमध्ये स्वतःचे घर घेणे खूपच अवघड झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये म्हाडा सारखी संस्था शहरातील गरीब व मध्यमवर्गीयांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यास सहाय्य करत आहे.
या पोस्टमध्ये आपण म्हाडा घरकुल लॉटरी योजनेची संपूर्ण माहिती पाहिली आहे. वरील माहितीच्या आधारे जर तुम्ही शहरांमध्ये स्वतःच्या घराचे स्वप्न पाहत असाल तर, आणि या योजनेसाठी लागणारी पात्रता निकष पूर्ण करत असाल तर, तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. धन्यवाद!