प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत (PMAY) गरीब व गरजूंना परवडणारी घरे बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची नावे घरकुल यादीमध्ये प्रसिद्ध केली जातात. ही घरकुल यादी ऑनलाइन उपलब्ध असते आणि कोणीही ही घरकुल यादी सहजपणे पाहू शकतो.
या पोस्टमध्ये आपण घरकुल योजनेची यादी कशी पहायची? याविषयीची सविस्तर माहिती पाहूया.
प्रधानमंत्री आवास योजनेविषयी थोडक्यात…
प्रधानमंत्री आवास योजना ही केंद्र सरकारद्वारे 25 जून 2015 रोजी सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत ग्रामीण व शहरी भागांमध्ये राहणाऱ्या गरीब व गरजू लोकांना परवडणारी घरे बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते.
ग्रामीण भागासाठी ही योजना प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण (PMAY-G) तर शहरी भागासाठी ही योजना प्रधानमंत्री आवास योजना-शहरी (PMAY-U) म्हणून ओळखली जाते.
प्रधानमंत्री आवास योजनेचा उद्देश्य देशातील सर्व गरीब व गरजू कुटुंबांना/लाभार्थ्यांना परवडणारी घरे त्याचबरोबर अनेक पायाभूत सुविधा प्रदान करणे.
घरकुल योजनेचे फायदे
घरकुल योजनेचे फायदे आपण खाली पाहूया:
- घरकुल योजनेमुळे गरीब व गरजूंना परवडणारी घरे बांधण्यासाठी आर्थिक मदत मिळते.
- घरकुल योजनेअंतर्गत देण्यात येणारा निधी हा थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये जमा होतो.
- घरकुल योजनेअंतर्गत घरकुलासोबतच वीज कनेक्शन, गॅस कनेक्शन, पाणी कनेक्शन, शौचालय या सुविधा देखील प्रदान केल्या जातात.
घरकुल यादी म्हणजे काय?
घरकुल यादी म्हणजे केंद्र किंवा राज्य सरकारच्या घरकुल योजनेअंतर्गत ज्या लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी किंवा घरांसाठी जी केंद्र व राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळणार आहे त्या लाभार्थ्यांची अधिकृत नावे असलेली सूची होय. ही यादी जिल्हा, तालुका व गावनिहाय विभागलेली असते.
घरकुल योजना लाभार्थी यादी कशी तपासायची?
विविध घरकुल योजनांची लाभार्थी यादी ऑनलाइन कशी तपासायची? याबाबतची स्टेप बाय स्टेप माहिती आपण खाली पाहूया:
प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण (PMAY-G)
- प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीणची लाभार्थी यादी पाहण्यासाठी तुम्हाला या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल. 👉🏽https://pmayg.nic.in
- अधिकृत संकेतस्थळावर गेल्यानंतर मेनू मध्ये Stakeholders पर्याय निवडा आणि त्याखाली IAY/PMAY-G Beneficiary वर क्लिक करा.
- त्यानंतर जर तुमच्याकडे नोंदणी क्रमांक (Registration Number) असेल तर तो टाका, जर नोंदणी क्रमांक नसेल तर, Advanced Search पर्याय निवडा.
- Advanced Search पर्याय निवडल्यानंतर येथे विचारलेले तपशील द्या यामध्ये राज्य, जिल्हा, तालुका, गाव निवडा.
- त्यानंतर तुमचे नाव, लिंग, प्रवर्ग (SC/ST/OBC/General) खाते क्रमांक सह बीपीएल क्रमांक आणि वडील/पतीचे नाव भरून सर्च करा.
- वरील सर्व तपशील भरून शोध या पर्यायावर क्लिक केल्यानंतर अंतिम प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण यादीमध्ये तुमचे नाव आहे का ते तपासा.
प्रधानमंत्री आवास योजना-शहरी (PMAY-U)
- प्रधानमंत्री आवास योजना-शहरीची लाभार्थी यादी पाहण्यासाठी तुम्हाला या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल. 👉🏽https://pmaymis.gov.in
- या अधिकृत संकेतस्थळावर गेल्यानंतर तुम्हाला Search Beneficiary या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर तुमचा आधार नंबर टाकून Show या बटनावर क्लिक करा.
- जर तुम्ही प्रधानमंत्री आवास योजना-शहरीचे लाभार्थी असाल तर तुमच्यासमोर तुमचे नाव, शहर, योजना प्रकार हे तपशील दिसतील.
महाराष्ट्रातील घरकुल योजना (रमाई, शबरी, वाल्मिकी-आंबेडकर)
- महाराष्ट्रातील घरकुल योजनांची लाभार्थी यादी पहायची असेल, तर तुम्हाला राज्य सरकारच्या या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल.👇🏼 https://mahaepos.gov.in
- राज्य सरकारच्या या अधिकृत संकेतस्थळाबरोबरच तुम्ही संबंधित जिल्हा परिषद/नगरपरिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन लाभार्थी यादी पाहू शकता.
- राज्य सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर गेल्यानंतर Beneficiary List या पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर जिल्हा, तालुका व ग्रामपंचायत निवडा.
- जिल्हा, तालुका व ग्रामपंचायत निवडल्यानंतर तुम्ही गावानुसार घरकुल लाभार्थ्यांची यादी पाहू शकता.
- घरकुल लाभार्थ्यांची यादी PDF स्वरूपात उपलब्ध असते, नाव शोधण्यासाठी तुम्हीही यादी डाऊनलोड करून घेऊ शकता.
वरील घरकुल लाभार्थ्यांची यादी आपण ऑनलाइन कशी पहायची? हे पाहिले आहे परंतु तुम्ही घरकुल लाभार्थ्यांची यादी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जाऊन पाहू शकता.
या पोस्टच्या माध्यमातून आपण घरकुल लाभार्थी यादी कशी पहायची? याबाबतची संपूर्ण माहिती पाहिली आहे. वरील माहितीच्या आधारे तुम्ही घरकुल लाभार्थी यादी पाहू शकता. घरकुल लाभार्थी यादी ही घरासाठी पात्र झालेल्या लोकांसाठी खूप महत्त्वाची असते. सरकारी योजनांचा लाभ वेळेत घेण्यासाठी लाभार्थी यादीमध्ये नाव तपासणे खूप महत्त्वाचे आहे. धन्यवाद!