वाल्मीकी-आंबेडकर घरकुल योजना 2025 – अर्ज प्रक्रिया, पात्रता, अनुदान..पहा संपूर्ण माहिती!

Ishaan Kumar

By Ishaan Kumar

Published on:

Ambedkar Gharkul Yojana 2025

Valmiki-Ambedkar Gharkul Yojana (VAMBAY): वाल्मीकी-आंबेडकर घरकुल योजना ही महाराष्ट्र सरकारची एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेची सुरुवात डिसेंबर 2001 मध्ये झाली. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकार 50% अनुदान देते आणि उर्वरित 50% अनुदान राज्य सरकारकडून दिले जाते. वाल्मिकी-आंबेडकर घरकुल योजनाही विशेषतः झोपडपट्टी वस्तीमध्ये राहणाऱ्या गरजू लोकांना स्वतःचे घर मिळावे यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये आपण वाल्मिकी-आंबेडकर योजनेविषयीची संपूर्ण माहिती पाहूया.

वाल्मिकी-आंबेडकर घरकुल योजना उद्दिष्ट

वाल्मीकी-आंबेडकर घरकुल योजनेचा प्राथमिक उद्देश शहरी भागातील झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या गरजू लोकांना निवारा प्रदान करणे हे आहे. वाल्मिकी-आंबेडकर योजना दारिद्र्यरेषेखालील लोकांच्यासाठी असून शहरातील झोपडपट्टी मध्ये राहणाऱ्या लोकांच्यासाठी नवीन घर बांधणे किंवा विद्यमान घरामध्ये सुधारणा करणे हे आहे.

या योजनेच्या माध्यमातून, शहरांमधून झोपडपट्ट्या कायमस्वरूपी नामशेष करून सर्वांना निवारा देण्याचे उद्दिष्ट साध्य करणे. घरांसोबतच या योजनेचा उद्देश लोकांना निरोगी वातावरण प्रदान करणे हा सुद्धा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. ज्याद्वारे झोपडपट्टीमध्ये राहणारे लोक दारिद्र्यरेषेतून बाहेर पडतील आणि त्यांचे राहणीमान सुधारेल.

वाल्मिकी-आंबेडकर घरकुल योजनेचे फायदे

वाल्मिकी-आंबेडकर आवास योजनेचे फायदे आपण खाली पाहूया:

  • या घरकुल योजनेमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना त्यांच्या स्वप्नातील घर तर, मिळतेच शिवाय शहरातील झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन होऊन शहरांचा विकास होते.
  • लोकांना स्वतःच्या घरामध्ये सुरक्षित आणि सन्मानाने राहता येते.
  • शैक्षणिक व सामाजिक प्रगतीला या घरकुल योजनेमुळे चालना मिळते.
  • स्वच्छता, शिक्षण आणि सुसंस्कृत जीवनशैलीमुळे चांगली पिढी निर्माण होऊन देशाचा विकास होतो.

वाल्मिकी-आंबेडकर घरकुल योजनेचा लाभ कोणाला घेता येतो?

वाल्मीकी-आंबेडकर योजना ही कोणासाठी लागू आहे? हे आपण खाली पाहूया:

  • अनुसूचित जाती (
  • अनुसूचित जमाती
  • इतर मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक
  • झोपडपट्टी व शहरांमध्ये असुरक्षित घरामध्ये राहणारे गरीब
  • घर नसलेली किंवा अत्यंत मोडकळीस आलेल्या घरात राहणारी नागरिक

वाल्मिकी-आंबेडकर घरकुल योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान

वाल्मिकी-आंबेडकर योजनेतून लाभार्थ्याला घर बांधण्यासाठी अनुदान स्वरूपात आर्थिक मदत दिली जाते. ग्रामीण व शहरी भागासाठी अनुदानाची रक्कम वेगवेगळी असते. ती याप्रमाणे…

  • ग्रामीण भागासाठी: 1,20,000 ते 1,50,000 रुपयांपर्यंत
  • शहरी भागासाठी: 1,50,000 ते 2,50,000 रुपयांपर्यंत (शहरी भागासाठी घराचे ठिकाण आणि योजनेच्या अंमलबजावणीनुसार अनुदान अवलंबून आहे.)

घरकुल योजनेसाठी वेळोवेळी शासनाकडून अनुदानाची रक्कम वाढवली जात असते.

वाल्मिकी-आंबेडकर घरकुल योजनेचे स्वरूप

  • वाल्मिकी-आंबेडकर घरकुल योजनेसाठी निवड झालेल्या लाभार्थ्यांना घराचे बांधकाम जसजसे टप्प्याटप्प्याने होईल तसे अनुदान दिले जाते.
  • घरकुलाचे काम स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत किंवा खाजगी बांधकाम कामगारांकडून केले जाते.
  • लाभार्थ्याला स्वतः घरकुलाचे बांधकाम करणे शक्य आहे, परंतु त्यासाठी संबंधित यंत्रणांकडून मंजुरी घेणे अनिवार्य असते.
  • घरकुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर व घरकुल संबंधित सर्व कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतरच घरकुलाचा अंतिम हप्ता  लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये हस्तांतरित केला जातो.

वाल्मिकी-आंबेडकर घरकुल योजना आवश्यक पात्रता

वाल्मिकी-आंबेडकर घरकुल योजनेसाठी जर तुम्ही अर्ज करणार असाल तर तुमच्याकडे खालील पात्रता असणे अनिवार्य आहे. सदरची पात्रता कोणती आहे? हे आपण खाली सविस्तर पाहूया:

  • या योजनेसाठी अर्ज करणारा अर्जदारा महाराष्ट्र राज्याचा कायमस्वरूपी रहिवासी असावा.
  • अर्जदाराचे किमान वय 18 वर्ष असणे अनिवार्य आहे.
  • अर्जदाराचे नाव सरकारच्या दारिद्र्यरेषेखालील यादीत असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराकडे त्याच्या स्वतःच्या नावावर पक्के घर नसावे.
  • अर्जदार झोपडपट्टी किंवा शहरातील असुरक्षित वस्त्यांमध्ये राहत असेल तर त्याला प्राधान्य दिले जाईल.
  • अर्ज करणाऱ्या अर्जदाराची वार्षिक उत्पन्न शासनाने ठरवून दिलेल्या ठराविक मर्यादेमध्ये असणे गरजेचे आहे. (सध्या 1 लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणे आवश्यक आहे, परंतु यामध्येही शासन वेळोवेळी बदल करू शकते.)

वाल्मिकी-आंबेडकर घरकुल योजना आवश्यक कागदपत्रे

वाल्मीकी-आंबेडकर घरकुल योजनेसाठी जर तुम्ही अर्ज करणार असाल तर, तुम्हाला काही कागदपत्रांची पूर्तता करणे अनिवार्य आहे. सदरची कागदपत्रे कोणती आहेत? हे आपण खाली पाहूया:

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • जात प्रमाणपत्र (SC/ST साठी)
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • बँक खाते तपशील
  • घर नसल्याचे प्रमाणपत्र (स्थानिक स्वराज्य संस्थांकडून)
  • झोपडपट्टीमध्ये वास्तव्य असल्याचा पुरावा (लागू असेल तर)
  • जमीन नसल्याचा दाखला (अर्जदाराकडे जमीन नसेल तर)
  • पासपोर्ट साईज फोटो

वाल्मिकी-आंबेडकर घरकुल योजनेसाठी अर्ज कसा करायचा?

वाल्मिकी-आंबेडकर घरकुल योजनेसाठी अर्जदाराला ऑनलाइन व ऑफलाइन असा अर्ज करता येतो. आपण या दोन्ही पद्धतीने अर्ज कसा करायचा? याबाबतची स्टेप बाय स्टेप माहिती खाली पाहूया:

वाल्मीकी-आंबेडकर घरकुल योजना ऑफलाइन अर्ज प्रक्रिया

  • वाल्मिकी-आंबेडकर घरकुल योजनेसाठी जर तुम्ही ऑफलाइन अर्ज करणार असाल तर, तुम्हाला संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या (महानगरपालिका/नगरपरिषद/नगरपंचायत) कार्यालयामध्ये जाऊन या योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
  • अर्ज घेतल्यानंतर अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती अचूक स्वरूपात भरून आवश्यक त्या कागदपत्रांची झेरॉक्स कॉपी जोडा.
  • अर्जाची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अर्ज संबंधित अधिकाऱ्याकडे जमा करून अर्जाची पोचपावती घ्या.

अशा पद्धतीने तुम्ही या योजनेसाठी ऑफलाइन अर्ज करू शकता.

वाल्मिकी-आंबेडकर घरकुल योजना ऑनलाइन अर्ज प्रक्रिया

  • सर्वप्रथम तुम्हाला या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.👉🏽 https://mahahousing.gov.in/
  • संकेतस्थळावर गेल्यानंतर तुम्हाला Schemes किंवा योजना विभागात जावे लागेल.
  • यानंतर वाल्मिकी-आंबेडकर घरकुल योजना निवडा.
  • ‘Apply Online’ यावर क्लिक करा.
  • यानंतर तुमचे नवीन खाते तयार करा किंवा लॉगिन करा.
  • अर्जामध्ये सर्व आवश्यक माहिती भरून या योजनेसाठी लागणारी सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
  • वरील सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा अर्ज व कागदपत्रे काळजीपूर्वक तपासून अर्ज सबमिट करा.
  • अर्ज सबमिट केल्यानंतर अर्ज क्रमांकाची नोंद ठेवा.

अशा पद्धतीने तुम्ही या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता.

वाल्मिकी-आंबेडकर घरकुल योजना ही महाराष्ट्रातील शहरांमध्ये राहणाऱ्या गरिबांसाठी खूपच महत्त्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत अनेक गरीब कुटुंबांना स्वतःचे पक्के घर मिळाले आहे. म्हणूनच आपण या पोस्टमध्ये वाल्मिकी-आंबेडकर घरकुल योजनेची संपूर्ण माहिती सविस्तरपणे पाहिले आहे. जर तुम्ही सुद्धा या योजनेचा लाभ घेणार असाल तर, वरील माहिती तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची ठरेल. धन्यवाद!

🖊 Ishaan Kumar – Auto News Specialist & Reviewer

As the founder and chief content creator at GharKulyojana.com Ishaan Kumar maintains a position as the leading news provider for bike and car information and analysis. Wielding extensive expertise and automotive passion, he provides readers with straightforward, genuine, expert analysis about both two-wheelers and four-wheelers.

Leave a Comment