Pradhanmantri Garmin Aawas Yojana 2025
भारतामध्ये अजूनही बहुसंख्य लोक हे गरिबी रेषेच्याखाली जीवन जगत आहेत, त्यांच्याकडे राहण्यासाठी स्वतःचे घर देखील नाही. हे लोक ग्रामीण भागामध्ये कच्च्या घरात, झोपडपट्ट्यांमध्ये किंवा अस्थायी निवाऱ्यांमध्ये वास्तव्य करत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने 2016 मध्ये प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना सुरू केली. ग्रामीण भागातील गोरगरीब, बेघर किंवा कच्च्या घरात राहणाऱ्या कुटुंबांना पक्के घर उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही योजना संपूर्ण भारतामध्ये राबवली जाते. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ग्रामीण व शहरी अशा दोन भागांमध्ये ही योजना राबवली जाते. आपण या पोस्टमध्ये फक्त प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजने विषयीची संपूर्ण माहिती पाहूया.
प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजने विषयी थोडक्यात..
प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना ही पूर्वीच्या इंदिरा आवास योजनेची विस्तारित व सुधारित आवृत्ती आहे. प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण (PMAY-G) 20 नोव्हेंबर 2016 रोजी सुरू करण्यात आली. या योजनेचा उद्देश ग्रामीण भागातील गरीब घटकांना घरे उपलब्ध करून देणे हा आहे. सदर योजनेअंतर्गत लाभार्थ्याची निवड तीन टप्प्यांमध्ये केली जाते. यामध्ये सामाजिक आर्थिक जात जनगणना सर्वेक्षण, ग्रामसभा मंजुरी आणि जिओ टॅगिंग यांचा समावेश आहे. या निवड टप्प्यांमुळे सर्वात गरजू व्यक्तीपर्यंत ही योजना पोचवली जाते. या योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या आर्थिक मदत लाभार्थ्याच्या बँक खात्यांमध्ये DBT द्वारे ट्रान्सफर केली जाते. या योजनेअंतर्गत घराच्या विविध बांधकाम टप्प्यांवर जिओ टॅग केलेल्या फोटोद्वारे प्रदेश-विशिष्ट गृहनिर्माण डिझाईन आणि पुराव्याच्या आधारित देखरेख देखील लागू करण्यात आली आहे.
प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेची आतापर्यंतची कामगिरी
सुरुवातीला 2023-24 पर्यंत 2.95 कोटी घरे बांधण्याचे लक्ष या योजनेअंतर्गत ठेवण्यात आले होते. नंतर यामध्ये 2 कोटी घरे वाढवण्यात आले आहेत. यासाठीचा एकूण खर्च 2024-29 साठी 3,06,137 कोटी आणि 2024-25 साठी 54,500 कोटी इतका आहे.
या योजनेमध्ये महिला सक्षमीकरणावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. यातील 74% मंजूर घरे शी केवळ किंवा संयुक्तपणे महिलांच्या मालकीची आहेत. आता ही योजना 100% महिलांना मालकी हक्क प्रदान करते.
प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना अनुदान रक्कम
लाभार्थ्याला या योजनेअंतर्गत केंद्र व राज्य सरकारकडून अनुक्रमे 60:40 याप्रमाणे अनुदान दिले जाते. यानुसार..
- सपाट भागांतील घरांसाठी 1,20,000 रुपये
- डोंगराळ आणि कठीण भागातील घरांसाठी 1,30,000 रुपये
- त्याचबरोबर लाभार्थ्याला 3% व्याजदराने 70,000 रुपयांचे कर्जही मिळते.
- स्वच्छ भारत मिशन अंतर्गत लाभार्थ्याला शौचालय बांधण्यासाठी अतिरिक्त 12,000 रुपये दिले जातात.
- मनरेगा अंतर्गत 90 दिवसाची मजुरी वेगळी दिली जाते.
प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना घराच्या आकारांचे मानक
- सध्या प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना अंतर्गत बांधल्या जाणाऱ्या घरांचा किमान आकार 20 चौरस मीटर वरून 25 चौरस मीटर करण्यात आला आहे.
- घर बांधताना एक हॉल, एक स्वयंपाक घर, एक शौचालय आणि एक बेडरूम असणे आवश्यक आहे.
- लाभार्थ्याला घराचे बांधकाम स्वतः करणे किंवा मजुरांमार्फत करून घेणे बंधनकारक आहे.
प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना राबवण्याची प्रक्रिया
- जिल्हा प्रशासन पंचायत समिती आणि ग्रामपंचायत यांच्यामार्फत प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना राबवली जाते.
- घराच्या बांधकामाच्या प्रत्येक टप्प्यावर निधी टप्प्याटप्प्याने लाभार्थ्याच्या बँक अकाउंटवर हस्तांतरित केला जातो.
- प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत AwaasSoft नावाचे सॉफ्टवेअर वापरून सर्व कामकाज पारदर्शकपणे चालते.
- घराच्या कामाचा फोटो आणि माहिती या पोर्टलवर अपलोड करणे लाभार्थ्याला बंधनकारक आहे.
प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना आवश्यक पात्रता
प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेचा लाभ घेण्यासाठीची आवश्यक पात्रता काय आहे? हे आपण खाली पाहूया:
- ज्या कुटुंबांमध्ये एकही खोली नाही किंवा एक किंवा दोन खोल्या आहेत आणि कच्ची भिंत आणि कच्चे छप्पर आहे अशी व्यक्ती या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहे.
- बेघर कुटुंबे सुद्धा या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत.
- 25 वर्षापेक्षा जास्त वयाचा साक्षर प्रौढ नसलेली कुटुंबे या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
- 16 ते 59 वयोगटातील प्रौढ पुरुष सदस्य नसलेली कुटुंबे या योजनेसाठी पात्र आहेत
- 16 ते 59 वयोगटातील कोणताही प्रौढ सदस्य नसलेली कुटुंबे
- ज्या कुटुंबांकडे एकही सक्षम सदस्य नाही आणि ज्यांच्या कुटुंबामध्ये एक ही अपंग सदस्य आहे.
- भूमिहीन कुटुंबे ज्यांना रोजंदारीवर काम करून उत्पन्न मिळते.
- विधवा महिला,अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर अल्पसंख्यांक यांना प्राधान्य
- आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटातील व्यक्ती पात्र
प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेसाठी जर तुम्ही अर्ज करणारा असाल तर तुमच्याकडे खालील आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे आहे.
- आधार कार्ड
- जात प्रमाणपत्र
- उत्पन्न प्रमाणपत्र
- निवास प्रमाणपत्र
- जॉब कार्ड किंवा जॉब कार्ड नंबर
- स्वच्छ भारत मिशन नोंदणी क्रमांक
- बँक खाते तपशील
- पासपोर्ट साईट फोटो
- मोबाईल नंबर
प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेसाठी अर्ज कसा करायचा?
प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेसाठी अर्ज हा ऑनलाइन व ऑफलाइन करता येतो. या दोन्ही पद्धतीने अर्ज कसा करायचा? याबाबतची स्टेप बाय स्टेप माहिती आपण खाली पाहूया:
प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना ऑनलाइन अर्ज प्रक्रिया
- प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेसाठी जर तुम्ही ऑनलाईन अर्ज करणार असाल तर, सर्वप्रथम तुम्हाला या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल. https://pmayg.nic.in/netiay/masterlogin.aspx
- संकेतस्थळावर गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला आर्थिक वर्ष निवडून यूजर आयडी व पासवर्ड टाकून कॅप्च्या कोड भरून लॉगिन करा.
- त्यानंतर तुमच्यासमोर वैयक्तिक तपशील विभाग दिसेल यामध्ये वैयक्तिक तपशील विभागात आवश्यक असलेली माहिती भरा.
- आधार क्रमांक वापरण्यासाठी आवश्यक असलेला संमती फॉर्म अपलोड करा.
- लाभार्थ्याचे नाव, पीएमएवाय आयडी आणि प्राधान्य शोधण्यासाठी सर्च बटनावर क्लिक करा.
- नोंदणी करण्यासाठी निवडा यावर क्लिक करा.
- लाभार्थ्याची माहिती आपोआप तयार होईल आणि तुमच्यासमोर प्रदर्शित होईल.
- त्यानंतर उर्वरित लाभार्थी तपशील भरता येतील जसे की मालकीचा प्रकार, नातेसंबंध, आधार क्रमांक इ.
- पुढील विभागांमध्ये आवश्यक असलेल्या फिल्डमध्ये लाभार्थी खाते तपशील जोडा, जसे की लाभार्थ्याचे नाव, बँक खाते क्रमांक इ.
- जर लाभार्थ्याला कर्ज घ्यायचे असेल तर होय निवडा आणि आवश्यक कर्जाची रक्कम प्रविष्ट करा.
- पुढील विभागांमध्ये लाभार्थ्याचा मनरेगा जॉब कार्ड क्रमांक आणि स्वच्छ भारत मिशन क्रमांक प्रविष्ट करा आहे.
- त्यानंतर पुढील विभाग संबंधित कार्यालयाकडून भरला जाईल.
अशा पद्धतीने तुम्ही प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता.
प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना ऑफलाइन अर्ज प्रक्रिया
- प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेसाठी जर तुम्ही ऑफलाइन अर्ज करणार असाल तर, तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या नजीकच्या ग्रामपंचायत, तलाठी किंवा पंचायत समिती कार्यालयामधून अर्ज घ्यावा लागेल.
- अर्ज घेतल्यानंतर अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरून अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रत जोडा.
- वरील सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सदरचा अर्ज व आवश्यक कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रत संबंधित अधिकाऱ्याकडे जमा करा.
- अर्जाची पडताळणी संबंधित अधिकाऱ्यांकडून केल्यानंतर लाभार्थ्यांची यादी तयार केली जाते.
- या यादीमध्ये जर तुमचे नाव असेल तर, तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.
अशा पद्धतीने तुम्ही प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेसाठी ऑफलाइन अर्ज करू शकता.
प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना ही गरिबांसाठी स्वतःचे घर बांधण्याचा खूप मोठा आधार आहे. ग्रामीण भागामध्ये वास्तव्यास असलेल्या अनेक लोकांना या योजनेअंतर्गत स्वप्नातील घर मिळाले आहे व मिळत आहे. त्याचबरोबर या योजनेअंतर्गत अनेक पायाभूत सुविधा सुद्धा शासनाकडून पुरवल्या जात आहेत. म्हणूनच आपण या पोस्टमध्ये या योजनेविषयीची संपूर्ण माहिती पाहिली आहे. वरील माहितीच्या आधारे तुम्ही सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकता. धन्यवाद!